Quantcast
Channel: लघुकथा
Viewing all articles
Browse latest Browse all 2466

(सम्मोहन)प्रेमाची भाषा

$
0
0

मूल लघुकथा :  सम्मोहन            अनुवाद :  प्रेमाचं सम्मोहन

 लेखक  :  रश्मि शर्मा              अनुवादक : डॉ. रश्मि नायर

प्रेमाची भाषा%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf-%e0%a4%b6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be-2

         त्या दिवशी ती मुलगी  थोडी उदास दिसत होती. मुलाला ते कळलं. पण कारण समजेना.  ते दोघे गच्चीवर बसले होते . मुलगी गालावर हात ठेऊन रिकाम्या डोळ्याने आकाशाकडे पहात होती. मुलगा कधी तिचा चेहरा पहात होता तर कधी आजु-बाजुच्या लोकांना .

      ती गच्ची साधारण नव्हती.  एका विशाल महालाची गच्ची होती.गच्चीच्या कठड्यावर आडोश्याला दोघे बसले होते. गुपचुप. मुलगा बोलत होता. ती नुसती हां-हुं करत होती .

      एकाएक ती उठली आणि म्हणाली चल आत जरा फिरुन येऊ.“मुलगा यंत्रासारखा मागे-मागे . तिथल्या लोकांचे चेहरे पहात, गर्दी पहात आणि महालाची नक्षीपण .   

      सर्वात वरच्या मजल्यावरची पायरीवर  मुलीने विचित्र भावनेने मुलाला  पाहिले . आता कदाचित त्याला कळल . काही तरी तिच लक्ष वेधत आहे. तिला काहीतरी हवं आहे. पण काय ? ते कदाचित मुलीला पण  माहित नाही.  मुलाला चांगल माहित होत , तिला यातुन बाहेर कसं काढायच. महालाच्या बाहेर खुप गर्दी होती. दोघे गर्दीत  धक्के खात चालत होते .

       एकाएकी मुलीच्या कानांत तो म्हणाला ” आय लव यु , आय लव यु “

तो लागोपाठ पुटपुटत होता . शब्दात आत्मा  उतरल्यासारखं.  ती स्वताला  हरवून बसली. फक्त ते ऐकुन .  जेव्हा  मुलाचे ओठ बंद झाले तेव्हा ती त्याला म्हणाली “जेव्हा तु असं बोलतो तेव्हा मी ध्यानमग्न होते . 

   शरीरापासुन ते आत्मा पर्यंतचे  सगळे बंधन सुटतात.  मला वाटत, मी मरताना, तु असाच जवळ येऊन माझ्या कानांत पुटपुटलास तर यमराजाचे बंधन सोडून मी परत येईन.

     धुक ओसरलं. निळ्या आकाशाखाली दोघे आता हसत होते .प्रेमात सम्मोहन असते हे स्पष्ट झाले.

-0-


Viewing all articles
Browse latest Browse all 2466

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>