मूल हिंदी लघुकथा : मल्लिका के फूल मराठी अनुवाद :थंडगार झुळुक
मूल लेखिका : डॉ सुधा गुप्ता अनुवादक : डॉ.रश्मि नायर
थंडगार झळुक
उन्हाळ्याची सुट्टी दर वर्षीप्रमाणे भाची आपल्या सहा वर्षाच्या लेकीसोबत फक्त सात दिवसासाठी आली . उदिता, बोलकी,चंचल, क्षणभरही एका जागेवर बसुन न रहाणारी . सगळे मामा तिला “उडी“ म्हणायचे. तीचं माझ्याशी खुप पटायचं. तिला वारंवार मी सांगायचे ” जा , उदि, थोडा वेळ मामांच्या खोलीत जाऊन झोप जरा आणि नंतर ये. पण ही नजर चुकवुन पुन्हा धावत आली. एकतर दुपारचा भयंकर उकाडा त्यात लाईट पण गेली. आंगणात येऊन जरा बसले.
फाटक उघडण्याची चाहुल लागली . अशा भर दुपारी कोण असु शकेल ?
कुरियरवाले पण सकाळी अकरा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच वाजता येतात.
एक हाडकुळीशी बाई,तिच्या डाव्या हातात एक गाठोडं होतं .माझ्या जवळ येऊन मला म्हणाली .”माय , तुझ्या पाया पडते, दोन थेंब पाणी पाज मला, तुझी फार किरपा होईल.
मी उठले, एवढया उकाड्यात थंडगार पाणी तीला बाधेल म्हणून एका रिकाम्या बिस्लरीच्या बाटलीत साद पाणी आणि थंडगार पाणी भरले पाण्याची बाटली तीला दिली तर तीनं ती घेतली नाही. गाठोड खाली ठेवुन ओंजळीतून पाणी प्यायली. गाठोड्यात हालचाल झाली . पाहून आश्चर्य वाटलं. अरे ! हे तर जीवंत बाळ, आत गेलेले गाल ,बाहेर आलेले डोळे. एवढ्या उनामध्ये हे दोघे माय-लेक कुठे धक्के खात फिरत आहे।
मी,आपल्याच विचारात आत जाण्यास वळते तर काय पहाते , उदि तिथे उभी राहुन सर्व पहात होती . ती भोळेपणाने म्हणाली ” आजी, तुम्ही म्हणताना उपाशी पोटी पाणी पिऊ नये. यांना आधी कही तरी खायला द्या. आणि रुह अफजाचं सरबत पण बनवुन दे न. मला स्वतावरच राग आला. हे मला कां सुचलं नाही ? ..मी उदिला प्रेमाने म्हणाले ” त्यांना जाऊ देऊ नको. मी त्यांच्या साठी न्याहरी घेऊन येते. ती त्यांना सांगुन माझ्या मागे आली .मी एका कागदाच्या प्लेटमध्ये खाण्याची वस्तु ठेवली आणि एका ग्लासामध्ये थंड दूध भरुन ठेवलं. तीला मागे पाहुन मी उदिला म्हणाले ” तू ही प्लेट धर.”
लगेच ती म्हणाली ” नाही, बाळासाठी दूध मी घेऊन येते .
बाहेर बसलेल्या बाईच्या हातात दूधाचा ग्लास देत ती म्हणाली “बाळाला हे दूध पाजा ” त्यावेळची तीची कृतज्ञदृष्टि माझ्या मनांत कायमची अशी उतरली की जीवनभर विसरणार नाही .
एवढ्या भीषण उकाड्यात गरम वारा सुटला असताना ते मायलेक कुठे गेले हे कळलं नाही . पण अचानक एक वार्याची झुळुक आली आणि जसं सुगंधी मोगराच्या फुलांचा वर्षाव झाल्यासारखं वाटल.
-0-