मूल हिंदी लघुकथा : मुखौटे , मराठी अनुवाद : चरित्रहीन
मूल लेखिका : :डॉ. भावना कुँअर अनुवादक :डॉ.रश्मि नायर
आज घरमालकाच्या घरी पुजा होती. सालाबादप्रमाणे भाडेकरु मालतीला वाटलं की काकी सांगायला विसरल्या असतील . आज बोलवणार याची खात्री होती. पण ती दारावर उभी, येत जात असलेल्या बायकांच्या पाया पडण्यात व्यस्त होती . ती सर्वात लहानपण होती. कॉलनीतल्या सगळ्या बायका तीला ओळखत होत्या आणी ती सर्वांची लाडकी होती. सगळ्या बायका आत गेल्या पण तीला कुणी ही आत बोलवलं नाही. मालती समजु शकली नाही की काय झालं ? तेव्हा तिच्या कानांत पुजेचे मंत्र स्वर गुंजायमान झाले. ती आपल्या मनांत सहस्त्र प्रश्न घेऊन आपल्या खोलीत गेली. कोण जाणे तीच्या जीवाला असं काय लागल . दुसरा दिवस उजाडला,तरी ती बाहेर पडली नाही. तेव्हा दारावर कुणीतरी कडी वाजवली . तीने दार उघडलं,समोर काकी होत्या. मालती त्यांच्या पाया पडली पण आशीर्वाद देण्यासाठी हातच उठले नाही आणि शब्दही तिच्या कानांवर पडला नाही .
तीने जे ऐकले ते एवढेच होते -“मालती तुला वाटल असेल की मी तुला पुजेला बोलवलं नाही पण गेल्यावर्षी बोलवलं होत. मी या वर्षी तुला मुद्दाम बोलवलं नाही कारण गेल्यावर्षी तुझा नवरा तुझ्या बरोबर होता . आता कुणाकडुनतरी ऐकल आहे की त्याला सोडण्यासाठी अर्ज केला आहे. हो मीच तुला सांगितल की तुझा नवरा एका मुली बरोबर तु नसताना दोन हप्ते राहिला. मला माहित आहे की तो चरित्रहीन आहे. पण हा समाज आहे ना, चरित्रहीन पुरुषाला स्वीकारतो पण बाई खरी आणि किताही चांगली असली तरी बाईलाच दोषी ठरवतो. कॉलनीत सगळेच तुझ्याबद्दल बरं-वाईट बोलत आहे. मला माहित आहे की तु चांगली आहे,पण माझा नाईलाज होता . ही पुजा सौभाग्यवतींची होती आणि तु आता सौभाग्यवती राहिली नाही ना बेटा !
ह्या सगळ्या गोष्टी कानांच्या वाटेने जाऊन मनांत बोचत होत्या. मुखावर कडुहास्य होतं. उशीरा कां होईना एकदा कळुन चुकलं की कसं-कसं आणि काय-काय विचार करतात ही लोक ! एका वेळेस दोन-दोन मुखवटे घालुन कसे मिरवतात ?
-0-