Quantcast
Channel: लघुकथा
Viewing all articles
Browse latest Browse all 2466

रस्म (एकच शब्द)

$
0
0

मूल कथा : रस्म                          अनुवाद : एकच शब्द

मूल लेखिका : अनिता ललित                  अनुवादक :डॉ.रश्मि नायर

       भांड पडल्याच्या आवाजाने शिखाची झोप उडाली. तीने घड्याळाकडे पाहिलं आठ वाजले होते. ती गडबडीत उठली . स्वताशीच पुटपुटली “काल आईंनी सांगितल होत, सकाळी लवकर उठायच “चूलपूजा” करायची आहे. शिरा पुरी पण बनवायची आहे आणि मी झोपून राहिली . देव जाणे काय होईल आता ?आई-बाबांना काय वाटेल ? आई रागात तर नसतील ना  हे देवा …

            तीला रडु येत होत. सासर आणि सासुच्या नावाची भीति तिला खुप घाबरवत होती . आजीने पण सांगितल होतं सासर आहे, जरा सांभाळुन रहा. कुणाला काही बोलण्याची संधि देऊ नको . नाहीतर तुला सतत त्यांचे टोमणे ऐकावे लागतील. सकाळी-सकाळी लवकर उठ आंघोळ आटपून साडी नेसून तयार हो. आपल्या सासु सासरेबुआंच्या पाया पड. त्यांचा आशीर्वाद  घे. तुझ्या आई –वडिलांना कोणी काही बोलेल असं काही करु नको .” शिखाच्या कानांत आजीची प्रत्येक गोष्ट घुमत होती.

      कशीबशी धावपळ करुन तयार झाली . घाईत खाली वर साडी नेसली बाहेर निघणार एवढ्यात तिच प्रतिबींब तिला आरश्यात दिसलं, न कपाळाला कुंकु होत न गळ्यात मंगळसुत्र . ती तशीच परत आली आणि पटापट कुंकु लावलं आणि टेबलावरच मंगळसुत्र उचलुन गळ्यात  घालुन ती खोलीच्या बाहेर गेली.

    तिच्या चेहर्यावरुन  दिसत होत की ती गडबडीत आहे. अक्षरश: धावत ती स्वयपाक घरात गेली .थेट तिथे जाऊनच ती थांबली .               

      तीची धांदल पाहून सासुला आश्चर्य वाटले. मग खालुनवरपर्यंत एकटक पाहुन हळुच गालातल्या गालात हसत म्हणाली येग, ये , झोप चांगली झाली की नाही. .? .

 शिखा घाबरतच म्हणाली  हो आई, झोप तर  आली . पण उशीरा आली म्हणुन सकाळी उठायला उशीर झाला, क्षमा करा .

“हरकत नाही. नवीन जागा आहे. होत अस ” सासुबाई म्हणाल्या .

शिखा आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पहात म्हणाली “पण शीरा पुरी …?

सासुबाई तिच्याकडे प्रेमाने पाहुन,  शिराच पातेलं तिच्या समोर ठेवलं आणि मधासारख्या गोड आवाजात म्हणाली “हो याला हात लाव.” म्हणजे झालं.

      शिखाने प्रश्नात्मक नजरेने पाहिल. सासु प्रेमाने तीची हनुवटी धरुन म्हणाली ” हे सगळं करायला  आयुष्य आहे. माझी एवढी चांगली बाहुली सारख्या सुनेचे आता हसण्या–खेळण्याचे दिवस आहेत. मी अत्तापासुन तीला स्वयपाक घराच काम  थोडी न करु देणार .तू फक्त आपल्या गोड प्रेमळ हास्याने सर्वांना वाढ. आजच्या प्रथेसाठी एवढंच भरपूर आहे.

      ऐकुन शिखाच्या डोळ्यात अश्रुच आले .तिने मीठी मारली . दाटलेल्या  कंठातुन फक्त एकच शब्द आला  ”  आई  “.

-0-


Viewing all articles
Browse latest Browse all 2466

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>